Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन ![vidio]

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाजार समितीसमोरील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ वीज लाईन स्टाफ कर्मचारी यांचे प्रलंबित व विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

महावितरण विभागात काम करणाऱ्या वीज लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना स्वतंत्र वेतनश्रेणी देण्यात यावी, वर्ग ४च्या नोकरीतील लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मध्ये वर्गीकरण करण्यात यावे, कर्मचारी यांचे कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवार १६ जानेवारी रोजी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान आज शुक्रवारी १९ जानेवारी रोजी उपोषणाचा चौथा दिवस उजळाला परंतू महावितरण प्रशासनाकडून उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी सकाळी ११ वाजता उपोषणस्थळी महावितरण कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. आमरण उपोषण सहभागी कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली असल्याने चार दिवस उलटूनही महावितरण प्रशासन लक्ष उपोषणाकडे लक्ष देत नसल्याचे आक्रमक झालेल्या लाईन स्टाफ वीज कर्मचाऱ्यांनी वसुलीसह विविध कामावर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहिल अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीचे पदाधिकारी सुभाष बाऱ्हे यांनी दिली.

 

 

Exit mobile version