वीज निर्मिती केंद्रातील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करा

भुसावळ, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रातील वेगवेगळ्या औष्णिक विज निर्मिती केंद्रात कोल कटेल /कोल अडीटी व नावाने झालेल्या जवळपास ६० कोटीच्या भ्रष्टाचाराची  उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ताफा अडवत वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

काल शुक्रवार दि. १३ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर आलेले ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांचा ताफा भुसावळ येथील राजस्थान मार्बल समोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अडविला. यावेळी त्यांनी ना. राऊत यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनाचा आशय असा की, कोल कटेल /कोल अडीटीव क्लीनकर होऊ नये यासाठी वापरण्यात आली. त्यासबंधीत कोणत्याही सरकारी लॅबचा लॅब रिपोर्ट संबंधित ठेकेदाराने दिला नाही. सदर TATA व NTPS यांनी नाकारलेली ही पावडर महाजेनकोने का स्वीकारली तसेच त्याच्या रेट प्रमाणे निविदेचे एस्टीमेटे का करण्यात आले नाही. ही पावडर अश फ्रीझन पॉईंट 1200०C तापमाणात वापरण्यास योग्य असताना आवश्यक आहे असे कंपनी च्या आहवाला वरून कळते परंतु कार्यालयीन नोंदी नुसार 1365०C तापमान असताना कोल कटेल /कोल आतिटयूड वापरण्याची आवश्यकता नसताना सदरची निविदा कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आली. या निविदामुळे विज निर्मिती वर कोणत्याच प्रकारचा फायदा झालेला दिसत नाही. उलट यामुळे विज निर्मितीच्या खर्चत वाढ झाली व त्याचा भार जनतेवर पडला आहे.
निविदा प्रकिया अतिशय घाईत व संशायस्पद झालेली दिसून आली आहे याची सुद्धा चोकशी करण्यात यावी. बजेटमध्ये प्रोव्हिजन नसताना ही निविदा काढण्यात आली यामुळे विज निर्मिती च्या खर्चत वाढ झाली आहे. या निविदेचा खर्च कोल इंधन मध्ये दाखविण्यात आले. वेगळा कोल विभाग असताना हा खर्च विज निर्मिती केंद्राने कसा केला आहे याची चौकशी करण्यात यावी. या निविदाची सर्व टेस्ट व त्या वरील रिपोर्ट हे सप्लाय केलेल्या कंपनीनेच दिले त्यामुळे हे सुद्धा संशयास्पद आहे. यामुळे क्लीनकर झाले नाही या संबधीत कोणताच केंद्राचा अहवाल नाही किंवा यामुळे कोळश्याची बचत झाली नाही असे असताना सुद्धा सर्व केंद्रात कशाच्या आधारे ही निविदा काढण्यात आली याची चौकशी करण्यात यावी. यासह दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळावा.
निवेदन देतांना वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, वंचित बहुजन महिलाआघाडी जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदना आराक,जिल्हा संघटक शोभा सोनवणे,भुसावळ तालुका सचिव गणेश इंगळे,भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव,भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, भारती इंगळे,रुपेश कुऱ्हाडे,स्वप्नील सोनवणे, बंटि सोनवणे,सोनकांबळे,संतोष मराठे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content