Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीज कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; एकावर तक्रार दाखल

एरंडोल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात महावितरणतर्फे वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक गेले असतात या पथकावर एकाने जीवघेणा हल्ला करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांसं  जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार आज  मंगळवार दि. ३० ऑगस्ट रोजी घडला आहे.

 

पिंपळकोठा विभागांतर्गत जावखेडा गावात अभियंता इच्छानंद  पाटील,  जनमित्र अक्षय महाजन , पंकज येवले,  सुनील महाजन आदींचे पथक वीज चोरी विरोधात मोहीम राबवीत होते. दरम्यान, मनोज प्रताप पाटील या ग्रामस्थाने आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले. पथकाने हा आकोडा काढून टाकल्याने मनोज पाटील यांनी लाडकी दांडक्याने पथकातील सदस्यांना मारहाण केली. या मारहाणीत अक्षय महाजन हे  जखमी झाले आहेत. यांनतर जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सर्व वैद्यकीय अहवाल आल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात येईल, असे एरंडोल पीआयने यांनी सांगितले आहे.

Exit mobile version