वीजेची तार तुटल्याने लागलेल्या आगीत केळी पिकासह ठिंबक नळ्या जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील सावखेडा खुर्द शिवारात शेतात महावितरणची विज तार पडून आग लागल्याने शेतातील केळी पिकाचे तसेच ठिबकच्या नळ्यां खाक होवून सव्वा दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवार १२ मे रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

 

जळगाव तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे नामदेव यादव पाटील वय 70 हे वास्तव्यास आहेत. त्यांची सावखेडा खुर्द शिवारात गट नंबर १५० या ठिकाणी शेती आहे. शुक्रवार 12 मे रोजी या शेतावरून गेलेली महावितरणचे विजेची तार अचानक तुटून शेतात पडली. त्यामुळे शेतात आग लागल्याने शेतातील उभ्या केळीचे पीक जळून खाक झाले तसेच शेतातील ठिबकच्या नळ्याचे सुद्धा खाक होवून नुकसान झाले आहे. या आगीमुळे एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकाराबाबत शेतमालक नामदेव यादव पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू पाटील हे करीत आहे.

Protected Content