Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीजचोरी करणाऱ्यांवर  कारवाईचा बडगा 

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी| “आकडेद्वारे’ किंवा मीटरमध्ये छेडखानी करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरण कंपनीने कारवाईचा बडगा उगारला असून तब्बल १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

राज्यात सध्या वीज गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी महावितरण कंपनीकडून वीज चोरट्याविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात धडक मोहीम सुरु आहे. यात “आकडेद्वारे’, मिटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामीण उपविभाग क्र. १ उंबरखेड कक्षांतर्गत गांवात धडक मोहीम राबविण्यात आली. यावेळी खालील दहा जणांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

कारवाई झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे 

साहेबराव लाला धनगर (देवळी), देविदास धर्मा कोळी (देवळी), शिवाजी दोधा धनगर (देवळी), समाधान भीमा तिरमली (वरखेडा), उत्तम महादू पाटील (देवळी), बबन निंबा पाटील (देवळी), लताबाई भीमा तिरमली (वरखेडा), समाधान हिलाल पाटील (वरखेडा), रावसाहेब श्रावण पाटील (आडगाव), व धनराज धर्मा तिरमली (वरखेडा) आदींवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान वीज ग्राहकांनी वीजेची चोरी करू असे आवाहन ग्रामीण उपविभाग क्र. १ चे उपकार्यकारी अभियंता खोब्रागडे यांनी केले आहे.

Exit mobile version