Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहीरीच्या पाण्यावरून तिघांना बेदम मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा!

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी*| वडिलोपार्जित सामाईक विहिरीचे पाणी वापरण्यावरून तिघांना जबर मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील घोडेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथील किसन पेला राठोड यांचे भाऊ धनराज पेला राठोड यांच्या घोडेगाव शिवारातील शेतात वडिलोपार्जित सामाईक विहिर आहे. दरम्यान १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास विहिरीचे पाणी वापरण्यावरून किसन पेला राठोड, पत्नी संगिता किसन राठोड व मुलगा ज्ञानेश्वर किसन राठोड यांना शिवीगाळ करून लाकडी काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. त्यापैकी विकास दशरथ पवार, रामेश्वर धनराज राठोड व संदीप दशरथ पवार अशांनी त्यांच्या हातातील लाकडी दांड्यांनी किसन पेला राठोड यांच्या डोक्यात मारून जबर दुखापत केली. त्यात मुलगा ज्ञानेश्वर सोडविण्यासाठी गेला असता धनराज पेला राठोड यांनी लाकडी दांड्यांनी मारहाण केली. तर दशरथ काळू पवार यांनी ज्ञानेश्वर राठोड यास धरून ठेवल्याने त्यावेळी फिर्यादीची आई संगिता किसन राठोड हिला ज्योती रामेश्वर राठोड यांनी चापट बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर किसन राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३२६, ३२३, ५०४, ५०६, १४३ व १४७ अशा विविध कलमान्वये धनराज पेला राठोड, विकास दशरथ पवार, रामेश्वर धनराज राठोड, संदीप दशरथ पवार, ज्योती रामेश्वर राठोड व दशरथ काळू पवार सर्व रा‌. घोडेगाव ता. चाळीसगाव आदींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version