Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहिरीत बाप लेकासह ४ जणांचा गुदमरून मृत्यू !

गोंदिया (वृत्तसंस्था) नवीन बांधण्यात आलेल्या विहिरीत बाप लेकासह ४ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगावात आज (गुरुवार) घडली आहे.

 

गावातील आत्माराम भांडारकर यांनी आपल्या घरासमोर विहीर बांधली होती. तिचे पूजन करण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांनी १ रोजी संध्याकाळी विहिरीचे पाणी स्वच्छ करण्यासाठी विहिरीत ब्लिचिंग पावडर, फिटकरी, तुरटी यांचे मिश्रण टाकले होते. विहिरीतले गढूळ व अस्वच्छ पाणी काढण्यासाठी मोटर पंप लावण्यात आली होती. या मोटारीचा फूटवॉल काढण्यासाठी त्यांचा मुलगा झनकलाल हा विहिरीत उतरला. मात्र उतरल्याबरोबर त्याला अस्वस्थ वाटू लागले व तो कसातरी करू लागला. ते पाहताच आत्माराम हेही विहिरीत उतरले. काही क्षणातच दोघेही गतप्राण झाले. गावातील विहिरीत गुदमरून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती क्षणाभरातच संपूर्ण गावात पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती प्रशासन, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाला दिली. यानंतर प्रशासन यंत्रणा, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढले. विषारी वायुमुळे चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version