Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहिरीत प्रौढाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी बुधवारी ८ मार्च रोजी दुपारी  नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 

नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भिलवाडा येथील सुनिल श्रावण मोरे हे त्यांच्या शेतातील विहिरीजवळ बुधवार ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पाणी घेण्यासाठी आले. त्यावेळी विहिरीत एका पुरूषाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. त्यांनी लागलीच गावातील नागरीकांना बोलावून घटनेची माहिती दिली. दरम्यान, गावातील काही नागरीकांनी मयताची ओळख पटविली. प्रमोद प्रल्हाद माळी (वय-४५) रा. वरची आळी, नशिराबाद ता.जि.जळगाव असे मयताचे नाव आहे. त्यानंतर नशिराबाद पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान, मयत प्रमोद माळी हे मंगळवारी ७ मार्च रोजी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.

Exit mobile version