Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहिंप बजरंग दल व सृष्टी मंगलम प्रतिष्ठानतर्फे बिजरोपन व संवर्धन अभियान

खामगाव, प्रतिनिधी । विहिंप बजरंग दल सृष्टी मंगलम प्रतीस्थांकडून  शहरालगत असलेल्या पानदेव टेकडी येथे वृक्ष, बीजरोपन व संवर्धन अभियान राबविण्यात आले. 

मागील काही दिवसांपासून विहिंप बजरंग दल व सृष्टी मंगलम प्रतिष्ठान सदस्यांकडुन बियांचे संकलन केल जात होते. या संकलीत केलेल्या बियांचे योग्य पोषक वातावरणामध्ये सदस्यांनी शहरालगत असलेल्या टेकड्या माळरान म्हणजेच हिरवळीने समृद्ध करण्याकरिता वृक्ष/बिज रोपण उपक्रम सुरू केला आहेत. यात माळ तेथे ताड ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत ताडवृक्ष बिजांचे मोठ्या प्रमाणात रोपण तसेच सिंदी,आंबा बकानीनीम,बिहाडा,करंज, कडूलिम्ब, जंगलीबदाम,शेवगा ,अर्जुन,शिवण,चिंच, विलायती  अशा अनेक झाडांच्या बिजांचे रोपन करण्यात येत आहे.  आज  प्रमुख उपस्थित रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे यांचा हस्ते वडवृक्ष व सृष्टी संवर्धन प्रतिष्ठानचे संजय गुरव  यांच्याहस्ते गोंधन वृक्षाचे रोपण टेकडीवरील पानदेव मंदिराजवळ  करण्यात आले व आजचा बीजरोपन उपक्रमाला सुरवात करण्यात आली. या बीजरोपन चळवळीमध्ये संघाचे प्रल्हाद निमकंडे,विश्व हिंदू परिषदेचे राजेंद्रसिह राजपूत, श्याम माळवंदे, सुभाष इटणारे, विकास आंबेकर, डॉ.रवींद्र संजोरे, सचिन चांदूरकर, अमोल जोशी, आदित्य केडीया, मंगेश वानखडे, सृष्टी संवर्धनचे किशोर भागवत, गौरव इंगळे,  मातृशक्तीच्या लतिका निमकंडे, भक्ती वाणी, मंगला गुरव ,दुर्गावाहिनीच्या   रोशनी तायडे, बजरंग दलाचे ऋषिकेश चोपडे, वेदांत चिंचोळकर ,राज राजपूत, कृष्णा पांढरे, साहिल भंगाळे, राम खरात आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

 

Exit mobile version