Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विष प्राशन केलेल्या तरुणीचा मृत्यू

 

 

जळगाव : प्रतिनिधी । लग्नाला विरोध असल्याच्या नैराश्यातून विष घेतलेल्या तालुक्यातील ममूराबाद येथील २२ वर्षीय तरूणीचा आज सकाळी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील ममुराबाद येथे एक २२ वर्षीय तरूणी आईवडीलांसह राहत होती . तरूणीची मोठी बहिणी अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथे सासरी राहते. त्यांच्या नात्यातील समाधान दगडू सैंदाणे (२३) या तरूणावर तिचे प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र मुलीच्या नातेवाईकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. या नैराश्यातून दोघांनी ममुराबाद येथील एका शेतात १८ जानेवारी रोजी दुपारी विषारी औषध प्रश्न करून घरच्यांना कळविले. नातेवाईकांनी तातडीन घटनास्थळी धाव घेवून दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले. समाधान सैंदाणे याची प्रकृती स्थिर असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

दुसरीकडे तरूणीची प्रकृती खालावल्याने आज २४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास कादीर तडवी करीत आहे.

Exit mobile version