विषारी औषध घेतलेल्या एकाचा मृत्यू

 

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील शेंदुर्णी येथील ५५ वर्षीय व्यक्तीने शेतात विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (वय-५५) रा. शेंदुर्णी ता. जामनेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील ज्ञानेश्वर गायकवाड हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांनी शेतात पिक फवारणीचे औषध घेतले होते. त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी सुरूवातीला जामनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहे.

Protected Content