Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विषय पत्रिकेत वार्डातील समस्यांचा समावेश न केल्याने नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा

भुसावळ, प्रतिनिधी  । भुसावळ नगरपरिषचे  सभा १६  जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र  या सभेत विषय पत्रिकेतवॉर्डातील समस्या न घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक दुर्गेश नारायण ठाकूर यांनी उपोषणाचा  इशारा मुख्याधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनाचा आशय असा की, भुसावळ नगरपालिकेची शुक्रवार १६  जुलै रोजी विविध कामांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये एकूण ३१७ विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.  या ३१७  विषयांमध्ये दुर्गेश ठाकूर यांच्या प्रभाग क्र. २४ मधील  एकही समस्येचा समावेश नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते आदिवासी समाजातून येत असल्याने हेतूपुरस्पर त्यांच्या वार्डातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या वार्डातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  नगरसेवक ठाकूर हे नेहमीच आपल्या वॉर्डातील समस्यांचा पाढा नगर परिषदेमध्ये मांडत असतात, मात्र त्यांच्या मागण्या व निवेदनांना केराची  टोपली दाखवण्यात येत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांच्या  समस्यांसाठी उपोषणा शिवाय आपणास पर्याय नसल्याने १४  जुलै रोजी भुसावळ नगरपरिषद येथे उपोषण करणार असल्याचा इशारा दुर्गेश ठाकुर यांनी दिला आहे.

Exit mobile version