विषबाधा झाल्याने नांदगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेचा केळी पिकावर फवारणी करत असताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने विषबाधा झाली होती. दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (वय-५५, रा.नंदगाव ता. जि. जळगाव) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांदगाव येथे जिजाबाई सोनवणे या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. शेतीचे काम करून ते आपल्या उदरनिर्वाह करत होते. २ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या नांदगाव शिवारातील शेतात केळीच्या पिकावर विषारी अळीनाशक औषधाचे फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर त्यांना विषबाधा झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार घेत असताना शुक्रवारी १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Protected Content