Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विश्व हिंदू परिषद , बजरंग दलाचा आरोग्य तपासणी मोहिमेत सहभाग

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी यांनी शहरात ७ दिवसांच्या लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात संपूर्ण जळगाव शहरात जळगाव शहर महानगरपालिकातर्फे शहरातील नागरिकांचे घरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम सुरू झालेली आहे. यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे कार्यकर्ते प्रशासनाच्या सोबत नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत.

आरोग्य तपासणी या मोहिमेअंतर्गत मनपाचे शिक्षक हे नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे शारीरिक तापमान तसेच श्वसनक्रिया मोजणी यंत्राद्वारे तपासण्या करत आहे.. शिक्षकांवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाचे कार्यकर्ते या शिक्षकांसोबत त्यांना सहकार्य करून मोलाची भूमीका बजावत आहे. तरी या सर्वेक्षणामध्ये विहिंप जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, बजरंग दल जळगाव जिल्हा संयोजक राकेश लोहार , जळगाव जिल्हा समरसता प्रमुख भरत कोळी, प्रचार प्रसिद्धी प्रमुख महेश अंबिकार, जळगाव महानगर उपाध्यक्ष हरीश कोल्हे , विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री दीपक दाभाडे, बजरंग दल महानगर संयोजक समाधान पाटील, सह पवन झुंजारराव, राजेंद्र नन्नवरे, कवी कासार ,आकाश पाटील, गणेश बच्छाव , मुकेश पाटील ,दीपक झुंजारराव, मंगेश काजवे ,राहुल जोशी , राहुल पाटील, संदीप महाले, महेश ठाकुर, किरण परदेशी, आकाश जाधव आदीपदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षकांसोबत संपूर्ण शहराचे तपासणी मोहिमेमध्ये सहभागी असणार आहेत.

Exit mobile version