Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी महाजन यांची बिनविरोध निवड

 

एरंडोल, प्रतिनिधी । एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत चेअरमन पदी आबासाहेब दुर्गादास राजाराम महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून साळुंखे उपस्थित होत्या.

एरंडोल विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपद निवडीप्रसंगी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन ,शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, माजी संचालक रमेश माधव पाटील ,माजी संचालक राजेंद्र महाजन, संचालक मंडळ सर्वश्री शांताराम धुडकू महाजन, वामन दौलत धनगर सर, नगरसेवक नितीन महाजन, आशीर्वाद जगन्नाथ पाटील, ईश्वर नारायण पाटील, सौ.शोभाताई सुभाष पाटील, आय जी माळी यांच्यासह युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, किशोर कुंझरकर सर, शिवदास महाजन,सुदर्शन महाजन ,परेश बिर्ला,सचिन महाजन, भाजयुमो चे शहराध्यक्ष प्रशांत महाजन,जितेंद्र महाजन, सागर महाजन ,अमोल भावसार,बबलू मराठे, योगेश महाजन, पंकज साळुंखे ऋषी शिंपी, नितीन बोरसे उपस्थित होते.या निवडीप्रसंगी संस्थेचे सचिव बापू पाटील, मॅनेजर रुपेश माळी,युवराज महाजन,भगवान महाजन, मंन्साराम महाजन,निंबा माळी ,अशोक जोशी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version