विविध योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध होण्याबाबत निवेदन 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कुऱ्हा, अंतुर्ली, घोडसगाव येथे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत विशेष शिबिर घेऊन विविध योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधार अर्थसाहाय्य योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांच्या अंतर्गत समाजातील वृद्ध, अपंग, विधवा परितक्ता यांना दरमहा अनुदान देण्यात येते.

या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी त्यांचा हयातीचा आणि नायब तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेला अत्यल्प उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो.

परंतु या योजनांचे लाभार्थी अपंग, निराधार वृद्ध, व्यक्ती असतात त्यांना हे दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे यावे लागते किंवा सिएससि सेंटर मार्फत काढावे लागतात.

हि बाब गैरसोयीचे ठरते, त्यामुळे तालुक्यात मंडळ स्तरावर कुऱ्हा, अंतुर्ली, घोडसगाव येथे नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत विशेष शिबिर घेऊन लाभार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांच्या कडे केली.

यावेळी डॉ. बि. सी. महाजन, तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, बाळा भालशंकर, संजय कोळी, विशाल रोठे, सुनिल तलवारे, मयुर साठे, चेतन राजपुत, भूषण पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार श्वेता संचेती यांनी लवकरच मंडळ स्तरावर असे शिबीर घेण्यात येतील, असे उपस्थितांना आश्वासन दिले.

Protected Content