Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विविध पक्षांच्या सभांची मेजवानी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – गुढीपाडवा मेळावानंतर राज ठाकरेंनी उत्तर सभा घेत १ मे रोजी जाहीर सभा घेण्याचे केले, तर भाजपच्या फडणवीस यांनी देखील मुंबई येथे सोमय्या मैदानावर ‘बुस्टर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ‘संकल्प’ सभा सुरु असून उद्धव ठाकरेंची मुंबईतच ‘सोक्षमोक्ष’ सभा होणार आहे.

राज्यात निवडणुकांचा हंगाम नाही, तरी देखील ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या सभा घेतल्या जात असून यातून एकमेकांवरच टोले-प्रतिटोले केले जात आहेत.

मनसेचे राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाजविण्याचे जाहीर केल्यानंतर १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यांनंतर आ.आणि खासदार यांनी ‘मातोश्री’ समोर हनुमान चालीसाचा आग्रह केल्याची परिणती अटकेत झाली. यावर मुख्यमंत्री यांनी मुंबईत जाहीर सभेची घोषणा करीत टोलेबाजी केली. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ठिकठिकाणी संकल्प सभा सूरु आहेत. यासोबतच मुंबईत भाजपच्या पोलखोल रथयात्रादेखील सुरु असून मुख्यमंत्री यांनी देखील  मास्क मुक्ती झाली नसली तर विना मास्क ची सभा घेणार असून १४ मे रोजी ‘सोक्षमोक्ष’ करण्याचे म्हटले आहे.

१ मे महाराष्ट्र दिनी मनसेची औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. त्याच दिवशी भाजपतर्फे मुंबईच्या सोमय्या मैदानावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र दिनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून ‘बुस्टर डोस’ सभा घेण्यात येणार आहे. याठिकाणी शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे मुंबई भाजपा प्रमुख अड्.आशिष शेलार यांनी जाहीर केले केले आहे.

Exit mobile version