Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहेच्छूक मुला-मुलींसाठी अंनिसतर्फे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरु

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे लग्नाळू, विवाहेच्छूक मुला-मुलींसाठी जोडीदाराची विवेकी निवड विभागातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी फोनद्वारे नोंदणी सुरु असून इच्छुकांनी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन जळगाव शाखेतर्फे करण्यात आले आहे.

 

जोडीदाराची विवेकी निवड विभागातर्फे आयुष्याचा साथीदार कसा निवडला पाहिजे, मनातील गोंधळ कसा दूर केला पाहिजे याबाबत प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी २१ बॅच यशस्वीपणे संपन्न झाल्या असून २२ व्या बॅचसाठी नोंदणी सुरु झाली आहे. जे लग्नाळू मुले मुली मानपान, पत्रिका, हुंडा, जातपात या सर्वांना फाटा देऊ इच्छिता, कांदेपोहेपेक्षा पूर्ण परिचयांती विवाह करण्याची इच्छा बाळगतात, सहजीवन आणि संसार यातील फरक समजून घ्यायचा आहे असे तरुण विवेकी मार्गाने योग्य जोडीदार निवडण्यासाठी क्षमता मिळवत असतात.
प्रशिक्षणाची संख्या अगदीच मर्यादित असून नव्याने बॅच मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. एकदा बॅच सुरू झाल्यावर मध्ये प्रवेश मिळत नाही. प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष फोनवर बोलणे अपेक्षित आहे. त्याकरिता दिक्षा –९९६०२५८५८९, हर्षल – ९६३७३५१४००, हरीश – ९४०३६१८३७५, माधुरी – ९४२३४२०२६३, सचिन – ८४२४०४११५९, आरती – ८६५२२२३८०३, कृष्णात – ८६००२३०६६० यांना संपर्क करावा असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी, जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, अशोक तायडे, मोहन मेढे, सुनील वाघमोडे, जिल्हा जोविनी विभाग कार्यवाह मिनाक्षी चौधरी यांनी केले आहे.

Exit mobile version