Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेवर तिघांचा २ वर्षे बलात्कार

मुंबई: वृत्तसंस्था । हाथरस अत्याचाराच्या घटनेनंतर मुंबईतही २२ वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. चाकूच्या धाकाने केलेल्या बलात्काराचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करीत दोन वर्षे तिघा जणांनी बलात्कार केला. दिंडोशी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केल्यावर दोन आरोपींना अटक केली आहे.

मालाड परिसरात ही घटना घडली. फयाज शेख ( ३१) आणि सादिक पटेल (२७) या दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. नदीम हा तिसरा आरोपी फरार आहे. . पीडित महिला पती आणि अडीच वर्षांच्या मुलासोबत राहते. शेख आणि महिला एकाच परिसरात राहत तो तिला आणि पतीला ओळखत होता. २०१८ मध्ये शेखने तिला कॉल केला. कामानिमित्त तिला घरी बोलावून घेतले. चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. व्हिडिओ त्याने शूट केला. वाच्यता केली तर अॅसिड टाकून मारण्याची धमकी दिली. नंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार केला.

वर्षभरानंतर शेख याने व्हिडिओ आणि तिचा फोन नंबर पटेल याला दिला. त्यानेही महिलेला ब्लॅकमेल केले आणि अनेकदा बलात्कार केला. नदीमला माहीत झाले. त्यानेही कॉल करून धमकावण्यास सुरुवात केली. पतीला सांगेन अशी धमकी दिल्यानंतर ती घाबरली. संसार वाचवण्यासाठी ती नदीमला भेटण्यास तयार झाली. नदीमनेही तिच्यावर बलात्कार केला. आरोपीनी आणखी एका मित्राला तिचा फोन नंबर दिला. त्यानेही तिला धमकावण्यास सुरुवात केली.

मुंबई सोडली तर त्रास थांबेल असं तिला वाटलं. ती मूळगावी गेली. सहा महिने ती तिथे होती. मात्र, आरोपी ब्लॅकमेल करत होते. अखेर त्रासाला कंटाळून तिने ही बाब पतीला सांगितली. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. २९ सप्टेंबरला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिंडोशी पोलिसांनी दोघांना अटक केली. तिसरा आरोपी नदीम फरार आहे.

Exit mobile version