Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

new small logo

जळगाव प्रतिनिधी । लग्नात हुंडा दिला नाही, मुलगी झाली आणि चरित्र्याचा संशय घेत विवाहितेचा छळकेल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगावचे माहेर आणि बारामती सासर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचे फेब्रुवारी २०१६ मध्ये रितीरिवाजाप्रमाणे गोदेश्वर मारोती पवार रा. बारामती जिल्हा पुणे यांच्याशी झाले. गोदेश्वर पवार हे पुण्यात पोलीस म्हणून नोकरीला आहे. दरम्यान लग्नाचे काही दिवस चांगले गेले. नंतर हुंडा कमी दिला यावरून सासरे मारोती नारायण पवार, नणंद अरूणा संदीप नवाले- पुणे, रेखा गणेश वाळुंज- मुंबई, सासु उषाबाई मारोती पवार यांनी टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर मुलगी झाली आणि चरित्र्याचा संशय घेवून शारिरीक आणि मानसिक छळ करत राहिले. याप्रकरणी विवाहिता हिच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version