विवाहितेच्या आत्महत्त्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा

जळगाव, प्रतिनिधी । आशाबाबानगरमधील पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने ९ जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेतले. ६० टक्के भाजलेल्या गृहिणीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. आज १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मयत सोनाली हिच्या वडीलांच्या तक्रारीवरुन जवाई नरेंद्र भगवान सोनवणे याच्यासह कुटूंबीयांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, पोलिस कर्मचारी नरेंद्र भगवान सेानवणे यांची पत्नी सोनाली हिने गुरुवारी ९ जुलै रोजी मध्यरात्री पेटवून घेतले होते. कुटुंबीयांनी त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. जळीत महिलेचे दीर योगेश सोनवणे यांनी घटनेची माहिती रामानंदनगर पेालिसांना कळविली होती. मृत्युनंतर आज १३ जुलै रोजी मयत सेानालीचे वडील नामदेव बुधा तायडे (रा.पिंपळगाव हरेश्‍वर) यांनी तक्रार दिल्यावरुन पेालिस कर्मचारी पती नरेंद्र, सासु प्रमिलाबाई, सासरे भगवान, दिर योगेश, दिरानी स्वाती, नणंद सरला देशमुख अशांच्या विरुद्ध तक्रार दिली. मयत सेानालीला स्वयंपाक येत नाही, बाळंतपणाचा खर्च माहेरच्यांनी द्यावा यासाठी तिचा छळ सुरु असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content