Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेचा १० लाखांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे, अशी मागणी करत तिचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनिवार १४ जानेवारी रोजी दुपारी ३I वाजता वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रामनगर येथील माहेर असलेल्या पूजा विजय लाड यांचा विवाह पुणे येथील विजय उखर्डा लाड यांच्याशी रिती रीवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती विजय लाड यांनी विवाहितेला माहेरहून १० लाख रुपये घर बांधण्यासाठी आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे देण्यास नकार दिल्याने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सासु सासरे व दीर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावत छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवारी १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती विजय उखर्डा लाड, सासू शारदा उखर्डा लाड, सासरे उखर्डा तुकाराम लाड, दीर संजय तुकाराम लाड सर्व रा. पुणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.

Exit mobile version