Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेचा विनयभंग करत तिच्या पतीला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत एका भागातील विवाहितेचा विनयभंग करत तिच्या पतीला बॅटने बेदम माहराण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

अधिक माहिती अशी की, शनिपेठ परिसरातील एका भागात विवाहिता ही पतीसह कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. विवाहिता ही रात्री घराजवळ असलेल्या मारोती मंदिराजवळ सार्वजनिक जागी उभ्या असतांना पंकज अंबादास सोनवणे हा त्याठिकाणी आला व त्याने विवाहितेसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला, याबाबत विवाहितेचे पतीने जाब विचारला असता, त्यांनाही पंकज याने तुटलेल्या बॅटने मारहाण केली तर सुभाष अंबादास सोनवणे व राधाबाई अंबादास सोनवणे या दोघांनी विवाहितेस शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन पंकज सोनवणे, सुभाष सोनवणे व राधाबाई सोनवणे या तिघांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव हे करीत आहेत.

Exit mobile version