Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहितेचा गळफास ; माहेरच्यांचा हत्येचा आरोप

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील राधाकृष्ण नगर भागात 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

 

सासरच्या मंडळींनी हुंडा  आणि चारित्र्याच्या संशयावरून तिला मारण्याचा आरोप मयत विवाहितेच्या  पित्याने केला आहे दुर्गा शेखर गायकवाड  असे या विवाहितेचे नाव आहे

 

दुर्गा शेखर गायकवाड हिचे लग्न खानावळ चालक शेखर गायकवाड यांच्याशी 23 डिसेंबर 2020 रोजी झाले होते  तिच्या घरासमोर जेठाणी – जेठाणी राहतात.  आज दुपारी वडील रिक्षाचालक दत्तू पाटील (  रा – प्रजापती नगर, जळगाव ) यांना एका व्यक्तीचा फोन आला की तुमची मुलगी आजारी आहे

 

त्यानंतर  दत्तू पाटील आणि भाऊ पुरुषोत्तम पाटील यांनी राधाकृष्णनगर गाठले सासरच्या मंडळींनी दोर कापून तिला जमिनीवर ठेवल्याचे आढळून आले मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे

 

घटनास्थळी सहाय्यक पोईस  अधीक्षक कुमार चिंथा , शहर पोलीस स्टेशन निरीक्षक धनराज वेरुळे यांनी भेट दिली दरम्यान दुर्गा गायकवाड या संशयावरून छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी  केला आहे जिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता याबाबत शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत

 

Exit mobile version