Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विवाहानंतर प्रेमसंबंध ठेवण्यास नकार ; प्रियकराकडून प्रेयसीची निर्घुण हत्या

परभणी (वृत्तसंस्था) विवाहानंतर आपली प्रेयसी प्रेमसंबंध ठेवणार नाही, याची खात्री होताच प्रियकराने नारळ तोडण्याच्या कत्तीने प्रेयसीच्या मानेवर व डोक्यावर वार करीत तिची निर्घुण हत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे.

 

मयत महिलेचे लग्नापुर्वी अन्य व्यक्तीशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकातील कर्मचारी तट्टुजवळा व पुणे येथे रवाना झाले. तेथे संशयीत संजय उर्फ पप्पू रमेश जोंधळे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्या महिलेशी विवाहपुर्वी संबंध असल्याचे कबुल केले. त्याने सांगितले की, फोनवरील संपर्कातून महिलेनेच त्याला यापुढे संपर्क ठेवणार नसल्याचे सांगून शेवटचे रामपुरी शिवारात भेटून जा असा निरोप दिला होता. त्यावरून तो त्या महिलेस भेटण्यास आल्यानंतर यापुढे ती प्रेमसंबंध ठेवणार नाही याची खात्री आल्याने त्याने नारळ तोडण्याचा आणलेल्या कत्तीनेच तिच्या गळ्यावर डोक्यावर वार करून तिचा खून केला.

Exit mobile version