Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोधकांनी आरोळ्या मारल्याच पाहिजेत, अन्यथा त्यांना महत्व राहणार नाही : ना. गुलाबराव पाटील (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । विरोधकांचं कामच आरोळ्या मारणे असते. त्यांनी हे काम केलचं पाहिजे, त्याच्याशिवाय त्यांना महत्व राहणार नाही, असा टोला टोला ना. गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता माजी मंत्री गिरीश महाजन यांना लगावला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री. महाजन यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका होती.

आरोग्यमंत्री राजेश टोपे आले होते तेव्हा झालेल्या बैठकीत ज्या अपूर्णता आहेत, त्या पूर्ण करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु, अद्यापही त्या पूर्ण करण्यात आल्या नसल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. त्यावर विरोध करणे हे विरोधकांचे कामच असल्याचा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी याला प्रतिउत्तर देतांना लगावला आहे. दरम्यान, कोविड संदर्भात कोण कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा आढावा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना पुढे म्हणाले की, कोविड संदर्भात कोण कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा आढावा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सिव्हिल हॉस्पिटल कोणत्या सुविधा करतो आहोत, पुढील काळात काय करावे लागेल, तालुकास्तरावर काय करावे याबाबत लोकप्रतिनिधींनीनी सूचना केल्या आहेत. त्या सूचनेनुसार पुढील काळात कामकाज केले जाईल असे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभीजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आदी उपस्थित होते.

येत्या पंधरा दिवसांत आढावा घेऊन गोदावरी मेडिकल कॉलेज पूर्ण ताब्यात घ्यावे लागेल का? यावर चर्चा करण्यात येईल असे ना. पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी केलेल्या सूचनांवर अंमलबजावणीसाठी करण्यासाठी ही बैठक होती. ज्या रुग्णांना कमी लक्षणे आहेत त्यांना हॉटेलमध्ये किवां चांगल्या ठिकाणी राहावे असे वाटते असेल तर तशा प्रकारची व्यवस्था तालुकास्तरावर जिल्हाधिकारी त्याचा दर ठरवून करण्यात येणार आहे. तसेच या हॉटेलमध्ये डॉक्टर जाऊन त्यांची नियमित तपासणी करणार आहेत. राज्यात प्लाझ्मा देण्याचे कामाची सुरुवात झाली असून जळगावात दोघांनी प्लाझ्मा दिला असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. ट्रायल ऑफ प्लाझ्माथेरपी करिता प्रोजेक्ट प्लॅटिना रेडक्रॉस रक्तपेढी येथे प्लाझ्मा फेरेसिसचा शुभारंभ करण्यात आले असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

 

Exit mobile version