Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरोदा येथील तलाठ्यांवर कारवाई करा ! : रिपाइंचे निवेदन

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विरोदा येथील तलाठी या कार्यालयाच्या ठीकाणी उपस्थित राहत नसल्याने रिपाइं आठवले गटाचे युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांच्या वतीने यावलचे  निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, विरोदा तालुका यावल येथील तलाठी हेमा सांगोळे या नेमणुकीच्या ठीकाणी राहत नसल्याने गाव आणि परिसरातील ग्रामस्थांना शासकीय कामास लागणारे विविध दाखले,उतारे घेण्यासाठी ग्रामस्थांना फिरावे लागत आहे.                             त्याचबरोबर शेतीच्या ई.पीक पाहणी रब्बी हंगामा करिता शेतकरी बांधवांना देण्यास टाळाटाळ करत आहेत म्हणून तेथील शेतकरी बांधवांना पीक नोंदणी करतांना अडचणी निर्माण होत आहेत.  उलट विरोदा या क्षेत्रातुन मोठया प्रमाणावर गौण खनिजची अवैध वाहतुक करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या विषयावर परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा रिपाई कडे मांडल्याने रिपाई हे ग्रामस्थांच्या मदतीला व न्याय मिळवुन देण्यासाठी धावुन आली आहे. रिपाईच्या वतीने देण्यात आलेल्या सदरच्या निवेदनात म्हटले आहे की ,विरोदा येथील तलाठी म्हणुन कार्यरत असलेले हे आपल्या कर्तव्यात कसूर करतांना दिसत आहेत.

 

तलाठी यांच्या विरूद्ध या आदी ही तक्रारी असुन तरी देखील संबधित तलाठी व अधिकार्‍यांचे काही साठे लोटे आहेत का? असा प्रश्न निर्माण होत असून, ग्रामस्थांना दाखले,उतारे व शेतकरी बांधवांना योग्य वेळी सहकार्य न करणार्‍या तलाठी विरोधात लवकरच तहसील कार्यालय यावल येथे रिपाई   जिल्हा युनिटच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी  सांगितले आहे. यावेळी रिपाईचे किरण तायडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवेदनाची दखल घेत महसुल प्रशासनाने तात्काळ न घेत कार्यवाही न केल्यास आपण लवकरच तहसील कार्यालयासमोर रिपाईच्या माध्यमातुन आंदोलन करणार असल्याचा ईशारा यावेळी सुपडु सदांनशिव यांनी दिला आहे.

Exit mobile version