Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरावली येथील नर्मदा पाटील यांचे वृध्दापकाळाने निधन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील विरावली येथील नर्मदाबाई पंडीत पाटील यांचे ९० व्या वर्षी वृध्दापकाळाने रविवारी १७ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले.

 

त्याचे पती पंडीत सुपडू पाटील यांचे सात दिवसांपुर्वी १० एप्रिल रोजी यांचे देखील वृध्दापकाळाने निधन झाले. घरात दु:खाचा डोंगर असतांना नर्मदाबाई यांचा वृध्दापकाळाने रविवारी १७ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. सायंकाळी ४ वाजता राहत्या घरातून अंत्ययात्रा निघाणार असून गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नर्मदा पाटील ह्या जळगाव जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी युवराज पाटील, भिमसिंग पाटील आणि देवीदास पाटील यांच्या मातोश्री होत.

 

Exit mobile version