Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विरावली ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांना अतिक्रमणाबाबत बीडीओंची नोटीस

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमणाबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याप्रकरणामुळे विरावली गावात खळबळ उडाली आहे. याप्रकणावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

अतिक्रमणाबाबत हेमंत काशिनाथ पाटील यांनी ३ मे रोजी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीत म्हटले आहे की, सन २०२०-२१ मध्ये पार पडलेल्या विरावली ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्या सखुबाई पाटील, सदस्य देवकांत पाटील आणि  शोभाबाई युवराज पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य पदावर असतांना शासकीय नियम धाब्यावर ठेवुन अतिक्रमण केले आहे. अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार यावल पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी १२ ऑक्टोबर रोजी १० वाजता विरावली गावात जावून सविस्तर तपाशिलवार घ्यावे. यात  सखुबाई पाटील , देवकांत पाटील आणी  शोभाबाई पाटील या तीन ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध आलेल्या अतिक्रमाची तपासणी करून पुढील कार्यवाही करीता अहवाल वरिष्ठाकडे पाठवणार आहेत. या विषयाकडे संपुर्ण विरावली गावाचे व परिसरात एकच चर्चा सुरू आहे. अहवाल झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

Exit mobile version