Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विराटच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या १०० मिलियन ; ऐतिहासिक कामगिरी

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विक्रमवीर विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या १०० मिलियन म्हणजेच १० कोटी इतकी झाली आहे. यातून त्याने एका नवा इतिहास घडविला असून इंस्टाग्रामवर इतक्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सची संख्या असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या विराटचा समावेश १०० मिलियन क्लबमध्ये झाला आहे. अशी कामगिरी करणारा तो क्रीडा जगतातील चौथा तर सेलिब्रेटीमधील २३वा व्यक्ती ठरला आहे.याआधी १०० मिलियन क्लबमध्ये पोहोचलेले जे खेळाडू होते ते सर्व फुटबॉलशी संबंधित होते. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो (२६६ मिलियन), अर्जेंटिनाचा लियोनेल मेसी (२६६ मिलियन) ब्राझीलचा नेमार (१४७ मिलियन) यांचा क्रमांक लागतो. आता विराट देखील यांच्या यादीत पोहोचला आहे.

 

Exit mobile version