विरवली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्मशानभूमीत स्वच्छता व वृक्षारोपण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथे जागतिक पर्यावरण दिन व ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या वतीने गावातील स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून केली. साफसफाई आणि विविध वृक्ष लावण्यात आले.

गावातील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेवुन श्रमदान करत स्मशानभूमीत काटेरी झुडपे कचरा यांची साफसफाई केली. तर त्याच परिसरात  वड, पिंपड, कडुनिंब,  बाभूळ, फुल झाडे, बांबू, निलगिरी या प्रजातीचे वृक्ष लागवड करत पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी आपले योगदान दिले.

या प्रसंगी श्रमदान करताना छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष, ग्रा.पं.सदस्य ॲड. देवकांत पाटील,  मनीष पाटील, मानवाधिकार प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य रणधीर पाटील, संस्थेचे संचालक देवेंद्र भीमसिंह पाटील, राकेश पाटील, राहुल राजपूत, चेतन पाटील, दिनेश फुलपगारे, प्रकाश पाटील, भूषण निळे, नवाब तडवी, गिरीश पाटील, निलेश निळे -पाटील, विरावली विकासोचे माजी चेअरमन संजय पाटील, विकास सोसायटी संचालक गुलाबराव पाटील, संचालक शरद पाटील, पीक संरक्षणचे संचालक गोरख पाटील, दगडू तडवी, नरेंद्र निळे, नथ्थू महाराज, विनोद पाटील, जितेंद्र धनगर, चेतन पाटील, साईबाबा पतसंस्थेचे संचालक पितांबर निळे, राष्ट्रवादी उपतालुकाध्यक्ष पवन पाटील, भूषण धनगर, आरपीआय विद्यार्थी अध्यक्ष राजेश अडकमोल, माजी उपसरपंच यशवंतराव पाटील, राष्ट्रवादी किसान उपतालुकाध्यक्ष गणेश राजपूत, भगवान पाटील, चिंधू निळे, पवन धनगर, हर्षल निळे आदी ग्रामस्थांनी श्रमदान करत वृक्षारोपण  करून ५ जून पर्यावरण दिन व ६ जून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला.

Protected Content