Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनीत पवार याचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कुलचा इयत्ता ९ वी “ड” चा विद्यार्थी विनीत जितेंद्र पवार याने जळगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या १७ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केल्याने विनीत पवार याची नाशिक विभागीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विनीत याच्या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, खलील देशमुख, वासुदेव महाजन, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विनीत पवार याचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच नाशिक विभागीय कराटे स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. विनीत पवार यास क्रीडा शिक्षक संदीप मनोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विनीत पवार याचेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version