Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

railway

भुसावळ, प्रतिनिधी । भुसावळ विभागाच्या खंडवा स्टेशनवर विना टिकट, अयोग्य तिकीट रोखण्यासाठी आज सोमवार (दि. २४) रोजी तिकिट तपासणी करण्यात आली

आरबीएफचे वरिष्ठ व्यवस्थापक व भुसावळ विभागातील वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. खंडवा स्थानकातील तिकिट तपासणी तपासणीसाठी एकूण २६ तिकिट तपासणी पथके, आरपीएफ पथक ६ ला ३३० प्रवासी अनियमित प्रवास करत असल्याचे आढळले. या प्रवाशांकडून दंड म्हणून एकूण १ लाख ९९ हजार ६६५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेमध्ये तिकीटविना प्रवास करणार्‍या ११६ प्रकरणांत ८७ हजार ११५ रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर अनियमित प्रवास करणार्‍यां २१४ जणांना १ लाख १२ हजार ५५० रुपये दंड आकारण्यात आला. . दंड भरण्यास असमर्थ असणार्‍या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. तसेच २ प्रवाशांसह कलम १५५ बी नुसार कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये मुख्य तिकिट निरीक्षक तपासणी वाय. डी. पाठक यांच्यासह एटीएस पथक, फिर्यादी पथक, आयसीपी चेक, सजनंग पथक, ओडी स्टाफ आणि इतर तिकिट तपासणी. कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version