Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनायक मेटेंच्या मृत्यूची होणार सीआयडी चौकशी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडीतर्फे चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर याबाबत मोठ्या प्रमाणात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. मेटे यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. यातच त्यांच्या दुसर्‍या ड्रायव्हरने ३ ऑगस्ट रोजी एका चारचाकीने त्यांचा पाठलाग करून कट मारल्याची माहिती दिल्याने हा संशयकल्लोळ बळावला आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून याची लवकरच सीआयडीतर्फे चौकशी करण्यात येणार आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version