Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा ते पिंप्राळा रोडवर विनापरवाना ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पोलीस पथकाने पकडले असून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ३ चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा ते पिंप्राळा रोडवरून बेकायदेशीरिता व विनापरवाना ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला ट्रॅक्टरवर कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने २३ जून रोजी मध्यरात्री कारवाई करत विना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर सावखेडा ते पिंप्राळ रोडवरून वाळू नेत असल्याचे दिसून आले. तीनही ट्रॅक्टर वरील चालकांना वाळू वाहतुकीचा परवानाबाबत विचारणा केली असता, तीनही ट्रॅक्टर चालकांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी वाळूने भरलेले तीनही ट्रॅक्टर जप्त केले आहे. या संदर्भात शनिवारी २४ जून रोजी रात्री उशिरा पोलीस नाईक मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरवरील ३ अनोळखी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.

Exit mobile version