Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनापरवाना लाकडांची वाहतूक करणारे वाहन पकडले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यात वृक्षांची तोड करणारा माफीया मोठया प्रमाणावर सक्रीय झाला असुन, वृक्षाची कत्तल करून परप्रातांत पाठविण्यात येत आहे. २८ फेबूवारी रोजी वन विभागाच्या धाडसी कार्यवाहीत विना परवाना अवैध तोड केलेल्या लाकुडासह सुमारे चार लाख १६००० रूपये किमतीचे लाकूड व वाहन जप्त करण्यात आहे .

 

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २८ फेबुवारी रोजी १०वाजेच्या सुमारास यावल फैजपुर मार्गावरील रस्त्यावर महाविद्यालयाच्या काही अंतरावर पुढे पुर्व विभागाचे वनपरिचेत्र अधिकारी विक्रम पदमोर व गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगार वनरक्षक यावल भैय्यासाहेब गायकवाड , वनमजुर अशोक माळी हे आपल्या पथकासह गस्तीवर असतांना ट्रक वाहन क्रमांक (एमएच १६, एई ९३१७) या वाहनातुन संशयीत आरोपी ट्रक वाहन चालक जुम्मा नबाब तडवी राहणार कोरपावली तालुका यावल हा त्याच्या ताब्यातील टाटा आयसर या वाहनातुन विनापरवाना निम पापडी प्रजातीचे १८००० घन मिटर जळाऊ किमत १६००० रूपये व टाटा आयसर ट्रक वाहन किमत चार लाख रुपये असे मुद्देमालासह जप्त करण्यात आले असुन , जुम्मा नबाब तडवी याच्या विरूद्ध वन गुन्हा नोंदविला आहे . या गुन्ह्याचा तपास वनसंरक्षक धुळे ( प्रा ) दिगंबर पगार  व सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगर कठोरा वनक्षेत्राचे वनपाल रविद्र तायडे हे तपास करीत आहे .

Exit mobile version