Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्यांसह दारू पिणाऱ्या ११ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरी नाक्याजवळील नारखेडे हॉटेलवर विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या आणि दारू पिणाऱ्या अकरा जणांवर सहाय्यक पोलीस अधिक्षकांनी कारवाई केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील नेरी नाक्याजवळील एसटी वर्कशॉपजवळील नारखेडे हॉटेलवर विनापरवाना व बेकायदेशीर दारूची विक्री करत असणाऱ्या दोघांसह दारू पिणाऱ्या नऊ जणांवर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास रेड टाकून कारवाई केली. बेकायदेशीर दारू विक्री करणारे निलेश प्रभाकर भावसार रा. कासमवाडी आणि योगेश प्रकाश पाटील रा. गोपाळ पुरा यांना अटक केली तर बिअरबार नसतांना दारू पिणारे सुखलाल तुकाराम भिल (वय-३८) रा. गावठाण उमाळा ता.जि.जळगाव, वणा राघो चव्हाण (वय-३८) रा. उमाळा ता.जि.जळगाव, सुभाष मधुकर पाटील (वय-४९) रा. तुकाराम वाडी, शशिकांत देविदास पाटील (वय-३०) रा. गोपाळपुरा, निखील राजेश सोनवणे (वय-२२) रा. गणपती नगर कुसुंबा ता.जि.जळगाव, संतोष नारायण बेडीकर (वय-४९) रा. अनुराग स्टेट बँक कॉलणी जळगाव, योगेश मोहन मर्दाने (वय-३०), राजपुराण ढंडोरे (वय-२४) दोन्ही रा. गुरूनानक नगर आणि संतोष श्रावण वाघ (वय-३८) रा. निफाळ ता.जि.नाशिक यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ४४० रूपये किंमतीची देशी विदेशी दारू हस्तगत करण्यात आली आहे. पो.कॉ. मुद्दसर काझी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या सुचनेनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल मोरे, सपोनि संदीप हजारे, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. मिलिंद सोनवणे, सुधीर साळवे व आरसीपी प्लाटून यांनी ही कारवाई केली.

Exit mobile version