Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैध गौण खनिज वाहतुक करतांना टॅक्टर ट्रॉली महसूल पथकाने पकडली आहे.यामुळे वाळु माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मागील १५ दिवसात तहसील प्रशासनाच्या पथकाने चार टॅक्टर ट्रॉलीवर कारवाई केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील थेरोळा शिवारात अवैध गौण खनिजची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. यावेळी तहसीलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन तहसीलदार कळसे निवासी नायब तहसीलदार सजंय तायडे मंडळ अधिकारी यांच्या पथकाने विना परवाना अवैध गौनखानिज वाहतूक करणारे वाहन क्रमांक (एमएच १९ ईए ३५८३) पकडले असुन यापूर्वी देखिल चार कारवाया महसूल प्रशासनाने केले आहे. विशेष म्हणजे महसूल विभागाचे एक मंडळ अधिकारी वाळु वाहतुकदारांना छुपी मदत करत असल्याची चांगली चर्चा आहे.नेहमी शनि मंदीर परिसरात वाळू माफियाच्या मांडीला-मांडी लाऊन वाळु वाहतूकदारांना मदत करणारा त्या मंडळ अधिका-यामुळे महसूल प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहेत.

Exit mobile version