Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनाकारण वावड्या उठविण्याचे काम का करताय ? : अजित पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाले तरी त्यांच्याकडे बहुमत राहणार असल्याने विनाकारण वावड्या का उठवत आहेत ? असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज उपस्थित केला आहे.

 

अजित पवार यांच्या भूमिकेबाबत राज्याच्या राजकारणात मोठा संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. ते राष्ट्रवादीतील एका गटासह सत्तेत सहभागी होतील अशी चर्चा सुरू आहे. मात्र आज त्यांनी या संदर्भात पहिल्यांदाच साफ इन्कार केला.

 

आज पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, अपक्ष धरून भाजपकडे ११५ आमदार आहेत. १०६ त्यांचे आणि नऊ अपक्ष. एकनाथ शिंदेसोबत गेलेले ४० आमदार, १० अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून १५५ आणि १० अपक्ष असे १६५ आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामळे जरी १६ आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकाड कायम राहणार आहे. यामुळे कुणीही विनाकारण वावड्या उठवू नयेत असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version