Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनयभंग प्रकरणात शेंदुर्णीच्या उपनगराध्यक्षाला सक्तमजूरीची शिक्षा

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात एकटी असतांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील उपनगराध्यक्ष गणेश पाटील याला जामनेर न्यायालयाने सुनावली एक वर्ष सक्तमजूरीची शिक्षा आणि ५ हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील उपनगराध्यक्ष गणेश किसन पाटील यांनी शेंदुर्णी येथील महिला शेतात एकटी काम करीत असताना पाणी पिण्याच्या पाहण्याने येऊन विनयभंग केला होता. याबाबत ३० ऑगस्ट २०२१ रोजी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच्या खटला जलद चालवण्यात आला. हा खटला जामनेर कोर्टात चालवण्यात आला यात पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात शेंदुर्णी येथील विद्यमान उपनगराध्यक्ष गणेश पाटील हे दोषी आढळून आले. त्यामुळे जामनेर कोर्टाने शेंदुर्णी येथील विद्यमान उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांना एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली तर ५ हजार रुपये दंड देखील केला आहे. जर दंड भरला नाही तर एक महिना शिक्षा वाढवण्यात येईल मात्र ह्या दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. ही शिक्षा न्यायाधीश बी.एम. काळे यांनी सुनावली असून यावेळी सरकारी वकील ॲड. अनिल सारस्वत यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, एएसआय शशिकांत पाटील, पोलीस नाईक अविनाश पाटील, मनोज बाविस्कर यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version