विधान परिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर

मुंबई प्रतिनिधी | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने दोन उमेदवार जाहीर केले असून यात अपेक्षेनुसार माजी मंत्री रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

 

शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई महानगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून विद्यमान आमदार गोपिकिशन बिजोरिया यांच्या नावाची आज शिवसेनेकडून घोषणा करण्यात आली. यात माजी मंत्री रामदास कदम यांच्या नावाचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे. कदम यांची आक्षेपार्ह ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यापासून त्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणार्‍या विधान परिषदेच्या सात मतदारसंघांतील आठ सदस्यांची मुदत १ जानेवारी रोजी संपत आहे. सोलापूर व नगर वगळता उर्वरित सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी  शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे तसेच विधान परिषद आमदार गोपिकिशन बिजोरिया हे आपला उमेदवारी अर्ज सोमवारी २२  किंवा मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी दाखल करतील.

 

Protected Content