Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विधान परिषदसाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर ; खडसे, मुंडेंसह तावडेंचा पत्ता कट

मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा पत्ता कट केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले होते. तर विधानसभेत बारामतीत अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झालेले गोपीचंद पडळकर या दोघांना भाजपने विधानपरिषदेला संधी देण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नेमकी काय भूमिका घेणार याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान, सध्याच्या समीकरणांनुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचा एक असे मिळून महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपाचे तीन आमदार थेट निवडून येऊ शकतात. मात्र नवव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version