Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यूत कॉलनी परिसरातून एकाच्या सायकलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विद्युत कॉलनी परिसरातून एकाची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना घडली आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश प्रकाश भंगाळे (वय-४५) रा. विद्युत कॉलनी जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. १० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची सायकल त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावली होती, ही सायकल अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेली. दरम्यान हा प्रकार त्यांना ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आला. या संदर्भात त्यांनी परिसरात शोध घेतला, परंतु सायकलचा कुठेही माहिती मिळाली नाही, अखेर शुक्रवारी २१ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता निलेश भंगाळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञान चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे करीत आहे.

Exit mobile version