Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यूतपुरवठा सुरळीत होण्यासाठी पुर्नाड सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन

muktainagarMIM

मुक्ताईनगर प्रतिनिधी । महावितरणाच्या भोंगळकारभारामुळे पुर्नाड सबस्टेशनवर भव्य शेतकरी मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. गेल्या महिन्याभरापासून थ्री फेज विद्यूत पुरवठा सुरळीत होत नसून शेतकऱ्यांचे आतोनात हाल होत आहे.

आधीच अवकाळी पाऊस, निसर्गाचा लहरीपणा तसेच गारपिटीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास सहन करावा लागत आहे. पुढच्या १० दिवसाच्या आत थ्री फेस विद्युतपुरवठा सुरळीत नाही झाल्यास भव्य असा शिंगाडा मोर्चा महावितरणावर काडून रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांतर्फे करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड. पवनराजे पाटील यांच्यामार्फत देण्यात आला. कार्यकरी अभियंता महेश पाटील, उप कार्यकारी अभियंता अजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे शेजोळे उपस्थित होते. सदरप्रसंगी ॲड.पवनराजे पाटील, साहेबराव पाटील, जगनाथ पाटील, शेषराव पाटील, गोपाळ पाटील, भागवत पाटील, सुभाष पाटील, पांडुरंग पाटील, आत्माराम पाटील, जितेंद्र पाटील, योगेश पाटील, विनायक पाटील, हर्षल पाटील, गणेश पाटील, मनोज पाटील, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, शांताराम पाटील, राहुल पाटील, श्रीकांत पाटील, राजेंद्र पाटील, भोला पाटील, मोहन पाटील , नितीन पाटील तसेच बहुसंख्या शेतकरी उपस्थित होते..

Exit mobile version