Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्युत मोटारीच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू !

मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला विद्युतचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील नायगावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायगाव येथील विजय उर्फ सोनू मराठे हा तापी नदीवरील मोटर चालू करून येतो असे भावाला सांगून गेला. परंतु तो दुपारपर्यंत घरी परतला नाही. त्यावर मोठ्या भावाने नदीपात्राजवळ जाऊन बघितले असता सोनू मराठे हा तरुण शॉक लागून मयत झाल्याचा दिसून आला. यावर मयताच्या भावाने आरडाओरड केली. तेव्हा गावातील नागरिक व पोलीस पाटील, सरपंच अशांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व घटनेबाबत पोलिसांना कळवले.

सदर घटना ८ मे रोजी घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी त्या ठिकाणी बसवलेली मोटर ही रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या मालकीची आहे. असे प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी सांगितले. आणि या मोटारीमध्ये करंट असल्याचे त्यांना माहिती दिलेली होती. परंतु त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे आज तरुणाला जीव गमवावा लागला. या घटनेप्रकणी रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोउपनि प्रदीप शेवाळे करत आहेत.

Exit mobile version