Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्याच्या रूममधून लॅपटॉप, मोबाईलसह रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंगरोडवरील एलआयसी कॉलनीतील एका तरूणाच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल आणि १० हजाराची रोकड असा एकुण २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार २९ डिसेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सुनिल भंगू राठोड (वय-२१) रा. मोताळा जि. बुलडाणा हा तरूण शिक्षण करत असून शहरातील एलआयसी कॉलनीत मित्रांसोबत राहत आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान राहत्या खोलीतून १० हजाराचा लॅपटॉप, ५ हजाराचा मोबाईल आणि १० हजाराची रोकड असा एकुण २५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी सुनिल राठोड याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस नाईक प्रतिभा पाटील करीत आहे.

Exit mobile version