Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त सहभाग

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पर्यावरणपूरक शाळू मातीचे गणेशमूर्ती निर्मीती कार्यशाळा श्रीमती शेवंताबाई खेमा टोके प्राथमिक विद्या मंदिर  येथे आयोजित करण्यात आली होती.  पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज ओळखून व विद्यार्थ्यांनमधिल सर्जनशिलतेला वाव देत स्वनिर्मितीचा आनंद मिळवून देण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

गुरुवार दि. २५ ऑगस्ट रोजी आयोजित पर्यावरणपूरक शाळू मातीचे गणेशमूर्ती निर्मीती कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून  गिनीज बुक व ओ.एम.जी नॅशनल बुक रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले मानवसेवा प्राथमिक विद्यामंदिरचे उपक्रमशील शिक्षक, कलाशिक्षक सुनिल दाभाडे हे होते   शाळेच्या मुख्याध्यापिका भावना पाटील यांनी सुनिल दाभाडे यांचे स्वागत केले   श्री. दाभाडे सरांनी ओघवत्या व सोप्या भाषेत मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सुबक व सुंदर गणेशमूर्ती करून दाखवल्या.  शाळेच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन सुंदर सुंदर अशा शाळू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. स्वनिर्मितीचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.  सूत्रसंचालन अजित चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पल्लवी टोके व उमाकांत नाथबुवा यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा पवार, तनुजा तळेले, शबाना डोंगरदे, जीवन शिसोदे, अजित चौधरी यांनी प्रयत्न केले.

 

Exit mobile version