Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेऊ नयेत ; अमित देशमुख यांच्या सूचना !

मुंबई (वृत्तसंस्था) सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या आहेत.

 

 

प्रथम द्वितीय तसेच तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा. या व अशा सर्व नॉन सर्टिफाइंग परीक्षा पुढील सूचने पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात अशी सूचना करण्यात आली आहे. अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाला बाधा निर्माण होणार नाही यादृष्टीने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात यावी, असे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘कोविड -१९’ चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. तसेच केंद्रीय मंडळाला कळविण्यात यावे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पसमध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही, अशी सूचनाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केली.कोविड -१९ चा प्रादुर्भाव कमी होताच या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. तसे केंद्रीय मंडळाला कळवण्यात यावे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या कॅम्पसमध्येच असल्यामुळे याबाबत फारशी अडचण येणार नाही, अशी ग्वाही अमित देशमुख यांनी दिली.

Exit mobile version