Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शासकीय शिष्यवृत्ती व धोरण या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्वामी विवेकानंद ज्यू कॉलेज मू जे महाविद्यालय जळगाव येथे विद्यार्थी कल्याण समिती तर्फे विद्यार्थ्यांच्या शासकीय शिष्यवृत्ती व शासकीय धोरण या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून संतोष मनुरे यांनी मार्गदर्शन केले.

या व्याख्यानावेळी मनूरे यांनी तळागळातील पात्र विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यासाठी शासनाने अवलंबलिले धोरण याचे विस्तृत मार्गदर्शन केले. खेड्या-पाड्यातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.

यावेळेस शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती व वसतीगृहाच्या विविध योजना व त्यासाठी असणारे निकष , पात्रता व लागणारे कागदपत्रक यांचे इत्यंभूत मार्गदर्शन केले गेले.

या कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी प्रा. के. जी. सपकाळे , समन्वयक स्वाती बऱ्हाटे, प्रा. उमेश पाटील, प्रा. प्रसाद देसाई व समिती अध्यक्ष प्रा जयंत इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. ज्योती मोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संदिप गव्हाळे, प्रा. योगेश धनगर, प्रा. कविता सोनवणे, प्रा. संदिप वानखेडे, प्रा.ज्योती मोरे, प्रा. विनोद पावरा, प्रा. दारासिंग पावरा यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version