Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीचा हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील २३ वर्षीय विद्यार्थ्यांनीही जळगाव शहरातील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. २५ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांनीही कॉलेजमध्ये जात असताना संशयित आरोपी राहुल अशोक बोरले रा. सांगवी ता. यावल याने विद्यार्थिनीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार केल्यानंतर तरुणीने आरडाओरड केली असता संशयित आरोपी राहुल बोरोले हा घटनास्थळाहून पसार झाला होता. याबाबत तरुणीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात रविवारी २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी राहुल अशोक बोरोले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.

 

Exit mobile version